ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमधील लिव्हर केअर तज्ञांशी सल्लामसलत आता डोंबिवली येथे देखील उपलब्ध होणार
न्यूज१ मराठी । नेटवर्क
ज्युपिटर हॉस्पिटलचे यकृत विभाग, ठाणे यांनी डोंबिवली आयएमए डॉक्टरांसाठी सीएमईचे आयोजन केले होते. सीएमईच्या व्यासपीठावर, ज्युपिटर हॉस्पिटलच्या सल्लागाराने व आयकॉन हॉस्पिटल संचालकांनी प्रत्येक शनिवारी आयकॉन हॉस्पिटलमध्ये लिव्हर रोग ओपीडी घोषित केले. ह्या तरुण आणि गतिशील लिव्हर संघाने नवीन संघ तयार केल्याच्या 18 महिन्यांच्या आत 75 यशस्वी लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियांचा वेगाने विस्तार केला. यात 82 वर्षे वयस्कर दात्याच्या यकृताचा वापर केले असून, फक्त 8 किलोग्राम वजन असलेल्या बाळाचे यकृत प्रत्यारोपण यशस्वी पद्धतीने केले आहे. 450 हून अधिक रुग्णांना गंभीर यकृत रोगासाठी उपचार दिले आहे आणि क्लिनिक / ओपीडीमध्ये हजारो पाहिले गेले आहेत.
केवळ रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सहाय्य प्रदान करण्यासाठी लिव्हर रोग आणि प्रत्यारोपण टीम वचनबद्ध नाहीत, तर शस्त्रक्रियेसाठी कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी कठोर परिश्रम घेतात. योग्य रुग्णांसाठी विविध खाजगी आणि सार्वजनिक भागीदारांद्वारे निधी उभारण्यात ही टीम सक्रियपणे सहभागी असते. पोस्ट-ट्रान्सप्लांट काळजी, ही, प्रक्रिया जितकीच महत्वाची आहे आणि टीम सर्जरीच्या पलीकडेही निरंतर पाठपुरावा करून समर्पित आयसीयूमध्ये नियमितपणे देखरेख ठेवते.
ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमधील लिव्हर केअर तज्ञांशी सल्लामसलत आता डोंबिवली येथे देखील उपलब्ध होणार
Reviewed by News1 Marathi
on
June 29, 2019
Rating:

Post a Comment