डोंबिवली शहर होणार स्मार्ट सिटी
न्यूज१ मराठी । नेटवर्क
ही शहरे स्मार्ट सिटी होतील का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
जागोजागी पसरलेला कचरा, वाहतूक व्यवस्थेकडे कानाडोळा, वाहतूक कोंडी आदि समस्यांनी डोंबिवलीकर हैराण झाले आहेत. अशातच स्मार्टसिटी मध्ये आपल्याला काहीतरी मिळेल अशी आशा डोंबिवलीकरांनी व्यक्त केली होती मात्र सद्यस्थितीत डोंबिवली शहर सुधारण्याच्या दृष्टीकोनातून कोणतेही पाऊल उचलेले दिसत नाही. डोंबिवली आणि ठाकुर्ली शहर एक किलोमीटरच्या टप्प्यात असल्याने नुसता डोंबिवली स्थानकाचा विकास मर्यादित न ठेवता ठाकुर्ली शहरातही त्याचा विकास व्हावा या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचे यावेळी स्मार्ट सिटी प्रकल्प प्रमुख प्रमोद कुलकर्णी यांनी सांगितले.
महापालिका हद्दीत येणार्या टीटवाळा आणि 27 गावे यांचाही समवेश स्मार्ट सिटी प्रकल्पात असेल अशी माहिती आयुक्त बोडके यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पात अधिक महत्त्व कल्याण पश्चिमेला देण्यात आले असून 2023 पर्यंत हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे.मात्र निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याने अनेक कामे असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. त्यामुळे कल्याण पश्चिमेसाठी आखलेला प्रकल्पच 2023 पर्यंत पूर्ण होणार का? याबाबत शंका आहे. डोंबिवलीकरांसाठी प्रकल्पाचे नियोजन कधी होणार आणि ते सत्यात कधी उतरणार यावर प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे डोंबिवली शहराचे स्मार्ट सिटीचे स्वप्न भंगणार असल्याची चर्चा होत आहे. याआधी मागवलेल्या निविदानाही प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेचा विकास रखडला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Reviewed by News1 Marathi
on
June 28, 2019
Rating:

Post a Comment