वारकर्यांना टोल माफी द्या
न्यूज१ मराठी । नेटवर्क
दरवर्षी विठुरायाच्या दर्शनासाठी वारीमध्ये लाखो वारकरी जातात. त्यावेळी यांना टोलनाक्यावर अडवले जाते. दरवर्षी वारकर्यांना सरकार टोलमाफी देत असते त्याप्रमाणे यावर्षीही पंढरीच्या दर्शनाला जाणार्या वारकर्यांच्या वाहनांना टोल माफी द्यावी अशी मागणी आमदार नरेंद्र पवार यांनी औचित्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला.
याबाबत दरवर्षी राज्य सरकार ज्याप्रमाणे टोल माफी करते त्याप्रमाणे याहीवर्षी करावी अशी सर्वांची अपेक्षा आहे. आणि यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक संपन्न झाली आहे.
वारकर्यांना टोल माफी द्या
Reviewed by News1 Marathi
on
June 27, 2019
Rating:

Post a Comment