Header AD

तृतीय पंथीयांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष उपक्रम

 न्यूज१ मराठी । नेटवर्क 

कल्याण पूर्वेकडील पत्रीपूल परिसरात शेकडो तृतीयपंथी राहतात. त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी वरदा महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या मदतीने स्थानिक नगरसेविका तथा महिला बालकल्याण समिती सभापती रेखा चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या अध्यक्षा वरदा जोशी यांनी पत्रीपूल येथे नगरसेविका रेखा चौधरी यांच्या कार्यालयात 30 ते 40  तृतीयपंथीयांना सेंटर फॉर डिस्टन्स एज्युकेशन एस.एन.डी.टी. वूमन युनिवर्सिटी  या माध्यमातून शिक्षणाबद्दलची पूर्ण माहिती या उपक्रमात देण्यात आली. तृतीयपंथी म्हटले की, समाज आजही त्यांना वेगळ्या नजरेने पाहतो. मात्र, तृतीयपंथीयांकडे बघण्याची समाजाची मानसिकता बदलावी म्हणून अनेक तृतीयपंथी शिकून केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागात शासकीय हुद्यावर नोकरी करीत आहेत. तरी देखील त्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने तृतीयपंथीयांसाठी शिक्षण आणि शिक्षणाचे फायदे या उपक्रमाला कल्याण येथे सुरुवात झाली आहे.

स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे. विशेष म्हणजे कल्याणमध्येही शेकडो तृतीयपंथी उच्चशिक्षित असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागात धोरण व तरतुद करून ठेवली असून, समाज आपल्याला कसा कमी लेखतो, त्यामुळे आपण पण यावर उपाय म्हणून शिक्षण घेऊ आणि सर्व समाजाला दाखवून देऊ की, आम्हाला समाज एक वेगळ्या नजरेने बघतो, तो बघू नये आता आम्हीही सन्मानाने जगू, असे मार्गदर्शन वरदा जोशी आणि रेखा चौधरी यांनी केले.

दरम्यान, हा उपक्रम आता दर शनिवारी व रविवारी तीन तास राबविण्यात येणार असून शिक्षण आणि शिक्षणाचे फायदे या उपक्रमाला कल्याणमधून सुरुवात झाल्याने उपस्थितीत तृतीयपंथी यांनी आयोजकांचे आभार मानले.
तृतीय पंथीयांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष उपक्रम तृतीय पंथीयांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष उपक्रम Reviewed by News1 Marathi on June 28, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

मुंब्रा बायपास रस्त्याला शिक्षण महर्षी कालसेकर यांचे नाव द्या शमीम खान

ठाणे (प्रतिनिधी)   मुंब्रा शहरातून बायपासच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याला ए. आर. कालसेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री ...

Post AD

home ads