Header AD

‘मी तुझीच रे’ म्हणत येतेय नवीन जोडी

 न्यूज१ मराठी । नेटवर्क 

‘मी तुझीच रे’ ही सोनी मराठीवरील नवीन मालिका 24 जून पासून सुरु होणार आहे आणि ज्याप्रमाणे या मालिकेच्या कथेत नाविन्य आहे त्याचप्रमाणे यामध्ये दिसणारी जोडी देखील नवीनच आहे.
अभिनयासह सोशल मिडीयावरील इंटरेस्टिंग पोस्ट्स आणि टिक टॉक व्हिडीयोमुळे युथमध्ये पॉप्युलर झालेली अभिनेत्री अमृता देशमुख आणि वेगवेगळ्या भूमिका आणि ‘तुमच्यासाठी काय पण’ या डायलॉगमुळे प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता संग्राम साळवी या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

‘मी तुझीच रे’ म्हणत येतेय नवीन जोडी

या मालिकेच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करतेय आणि पहिल्याच प्रोमोमध्ये त्यांच्यामध्ये उडणार-या खटकांचा अंदाज आल्यावर अनेकांना एकच प्रश्न पडेल की नेमके होणार काय... ‘36चा आकडा की जुळणार 36 गुण?’
या मालिकेत संग्राम ‘जयदत्त काळे’ची भूमिका साकारतोय जो अतिशय मेहनतीने उपजिल्हाधिकारी बनला आहे तर  अमृता ‘रिया वर्दे’च्या भूमिकेत दिसणार आहे जी श्रीमंत कुटुंबातील बेफिकिर, सडेतोड उत्तर देणारी मुलगी आहे. रियाचा बंडखोर, उध्दट स्वभाव आणि अगदी त्याच उलट जयदत्तचा कूल, फ्रेण्डली आणि माणुसकीची जाण असणारा स्वभाव आहे. अशा दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तींमधील केमिस्ट्री, नोक-झोक पाहण्यासाठी नक्की पाहा ‘मी तुझीच रे’ मालिका 24 जून पासून दर सोमवार ते शनिवार सायंकाळी 7 वाजता फक्त सोनी मराठीवर.
‘मी तुझीच रे’ म्हणत येतेय नवीन जोडी ‘मी तुझीच रे’ म्हणत येतेय नवीन जोडी Reviewed by News1 Marathi on June 27, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

कोनगांव ग्राम पंचायतीने जन आंदोलनाचा ईशारा देताच एम,आय,डीसी विभागा कडून पाणी पुरवठा सुरळीत

भिवंडी दि.६ (प्रतिनिधी  ) गेल्या वर्षभरापासून कोनगावला एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाकडून अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.त्यातच कोवि...

Post AD

home ads