Header AD

जयश्रीराम बोलण्यासाठी ओला चालकाला मारहाण

 न्यूज१ मराठी । नेटवर्क 

23 जून रोजी पहाटे 3 वाजता फैसल खान हा प्रवाशी घेऊन मानव कल्याण हॉस्पिटलसमोर, आगासन रॉड, दिवा पूर्व येथे आला होता. त्यानंतर दिव्यातून जाताना दुसरे प्रवाशी घेण्यासाठी थांबला असताना अचानक रस्त्यातच गाडी बंद पडली. गाडी सुरु करण्याचा  प्रयत्न करीत असतानाच स्कुटीवरून आलेल्या मंगेश चंद्रकांत मुंडे(30), अनिल राजाराम सूर्यवंशी(22) आणि जयदीप नारायण मुंढे(26) यांनी फैसल यास रस्त्यात गाडी उभी केल्याचा जाब विचारला मात्र गाडी बंद पडल्याचे सांगत असतानाच त्रिकुटाने फैसल याला लाथाबुक्क्याने मारहाण केली. तर फैसल याला त्रिकुटाने गाडीच्या बाहेर काढून मारहाण केली.

जयश्रीराम बोलण्यासाठी ओला चालकाला मारहाण

स्कुटीच्या डिक्कीतून वायर काढून मारहाण करीत असताना  ‘अल्ला के वास्ते मुझे छोड दा’े असे म्हणताच तू मुस्लिम है, महंत बोल जय श्रीराम बोल म्हणून मारहाण केली. सुटका झालेल्या फैसल याने मुंब्रा पोलीस ठाण्यात हकीकत सांगितली. मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मंगेश, अनिल आणि जयदीप यांच्या विरोधात भादंवि 295ए,392,323,504,506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.   
जयश्रीराम बोलण्यासाठी ओला चालकाला मारहाण जयश्रीराम बोलण्यासाठी ओला चालकाला मारहाण Reviewed by News1 Marathi on June 28, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads