ठाण्यातील अनधिकृत शाळांवर कारवाईची मनविसेची मागणी
न्यूज१ मराठी । नेटवर्क
ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात यावी यामागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने ठाणे महापालिका शिक्षण विभाग कार्यालयाबाहेर निदर्शने केली. ठाणे महापालिका शिक्षण विभागाने ठाणे महापालिका क्षेत्रातील वागळे इस्टेट, राबोडी, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागातील 64 शाळा अनधिकृत म्हणून घोषित केल्या आहेत. या शाळा बंद करण्याचे आदेश लोकायुक्तांनी ठाणे महापालिका शिक्षण मंडळाला दिले असताना देखील आजपर्यंत एकही शाळेवर महापालिकेने कारवाई केलेली नाही. त्यामुळे यामध्ये शिकणार्या सुमारे 10 हजार विद्यार्थी मूलभूत सोयींपासून वंचित राहत असल्याने मुलांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या अनधिकृत शाळांवर कारवाई करून यामध्ये शिक्षण घेणार्या मुलांना जवळच्या अधिकृत शाळांमध्ये सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव व शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष अरुण घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिका शिक्षण विभाग कार्यालयाबाहेर अनधिकृत शाळांची नावे असलेले फलक गळ्यात अडकवून निदर्शने केली व शिक्षण मंडळ उपायुक्त मनीष जोशी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुशांत डोंबे, प्रितेश मोरे, अंकिता सारंग, ओंकार महाडिक, सागर कदम, विरेश मयेकर, थॉमस रेपो, जितू रायकर, निरंजन रावराणे , अक्षय मोरे, प्रथमेश काजारी, वीरेंद्र पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाणे महापालिका क्षेत्रातील 64 अनधिकृत शाळांची यादी शिक्षण मंडळाने जाहीर केली होती. या शाळा बंद करण्यासंबंधीचे पत्र लोकायुक्तांनी शिक्षण विभागाला दिले असताना देखील ठाणे महापालिका शिक्षण मंडळ कारवाई करत नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार अशाप्रकारच्या अनधिकृत शाळांना एक लाख रुपये दंड तसेच दंड घेतल्यानंतर शाळा सुरु राहिल्यास प्रतिदिन 10 हजार दंड व नंतर फौजदारी कारवाई अपेक्षित असताना देखील कोणतीही कारवाई शिक्षण मंडळ करत नसल्याने यामध्ये शिकणार्या मुलांचे नुकसान होत आहे त्यामुळे सदरचे आंदोलन करण्यात आल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे शहर अध्यक्ष अरुण घोसाळकर यांनी सांगितले.

Reviewed by News1 Marathi
on
June 28, 2019
Rating:

Post a Comment