Header AD

सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा महिलांना प्रेमळ सल्ला न्यूज१ मराठी । नेटवर्क 

स्वतःला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपा 

स्वतःला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपा, तब्येतीची काळजी घ्या, तरच कुटुंबाची काळजी तुम्ही सक्षमपणे घेऊ शकता, असा प्रेमळ सल्ला सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी महिलांना दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच सावित्री व स्पंदन प्रतिष्ठान आयोजित यांच्या पुढाकाराने आणि कॅन्सर पेशंट अँड असोसिएशन व ओगान कॅन्सर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत कर्करोग निदान शिबिरात त्या बोलत होत्या. ठाण्याच्या बेथनी हॉस्पिटलसमोरील कृष्णाई सभागृहात झालेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून येथील शेकडो महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. सावित्री प्रतिष्ठानच्या रिटा गुप्ता व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या  शिबिरात स्तन तपासणी, पॅप स्मिअर, एच.पी.व्ही., ब्लड प्रेशर, कान, नाक, घसा आदी तपासण्या करण्यात आल्या. यावेळी शिबिराला उपस्थित वर्षा उसगावकर यांनी महिलांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा महिलांना प्रेमळ सल्ला

 महिलांनी किमान दर महिन्याने आवश्यक रक्त तपासण्या तसेच इतर तपासण्या केल्या पाहिजेत. या तपासण्यांना न घाबरता त्यानंतर कोणकोणते उपाय संबंधित आजारांवर करायला हवेत, याबाबत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत, असा आधारही उसगावकर यांनी दिला. महिलांनी सरकारी योजनांची माहिती करून घेतानाच सोशल मीडियाच्या माध्यमातून या योजना तसेच आजारांबाबत माहिती घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ.मिनाक्षी मानकाने, डॉ. रचना मेहरा, डॉ. तृप्ती पोयरेकर, डॉ. अमोल हेंकारे यांनी महिलांची तपासणी केली. वर्षा उसगावकर यांनी तपासणी करून घेतली. अभिनेत्री असल्याचा कोणताही बडेजाव न बाळगता वर्षा उसगावकर यांनी सर्वसामान्य महिलांसोबत स्वतःच्या विविध तपासणी या शिबिरात केल्या. यावेळी चांगलं जेवण, औषधे घेणे ही आपल्या शरीराची काळजी घेणे नसून वेळोवेळी तपासण्या करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 
सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा महिलांना प्रेमळ सल्ला सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा महिलांना प्रेमळ सल्ला Reviewed by News1 Marathi on June 29, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत ओळ्ख पत्रावर चुकीच्या परीक्षा केंद्राचा उल्लेख केल्याने शेकडो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित..

भिवंडी : दि.२८ ( प्रतिनिधी )   राज्य शासनाने शिक्षणासंदर्भात कोणतेही धोरण निश्चित न केल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्ग हैराण झाला असतानाच  अन...

Post AD

home ads