Header AD

फुलपाखरू उद्यानात बिबट्याची सैर

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

ठाण्यात चक्क उद्यानात बिबट्या मॉर्निंग वॉक करताना आढळला. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा येथील फुलपाखरु उद्यानात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन घडले. याठिकाणी दररोज सकाळी नागरिक मॉर्निंग वॉक करण्यासाठी येतात. सकाळी बिबट्या आल्याचे कळताच वनविभागाच्या अधिकार्‍यांनी नागरिकांना उद्यानाबाहेर काढून बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण केले. मात्र, पथक येण्याआधीच उद्यानाच्या भितीवरून उडी मारून बिबट्याने धूम ठोकली.

फुलपाखरू उद्यानात बिबट्याची सैर

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा फुलपाखरू उद्यान हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत आहे. बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या भिंतीवरून उडी मारुन फुलपाखरु उद्यानात शिरला. तब्बल दोन तास बिबट्या या उद्यानात ठाण मांडून होता. काही वेळानंतर बिबट्या पुन्हा आल्या त्याच भितिंवरुन उडी मारुन परत नैसर्गिक अधिवासात गेला अन ठाणेकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या दरम्यान वन विभाग देखील बिबट्यावर लक्ष ठेवून होते त्यांची रेस्क्यु टीम घटनास्थळी दाखल होण्याआधीच बिबट्या मात्र मॉर्निग वॉक करुन पुन्हा जंगलात पळाला.
फुलपाखरू उद्यानात बिबट्याची सैर फुलपाखरू उद्यानात बिबट्याची सैर Reviewed by News1 Marathi on June 27, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी कल्याण मार्गावर महाकाय झाड कोसळले सुदैवाने जिवीत हानी टळली

भिवंडी ,   प्रतिनिधि  :   भिवंडी कल्याण मार्गावर असलेल्या लाहोटी कंपाउंडच्या बाजूला एक महाकाय झाड कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. स...

Post AD

home ads