Header AD

करीयर घडवणारी अ‍ॅप्स

 न्यूज१ मराठी । नेटवर्क 

विशेषतः जेव्हा तुम्ही घरापासून लांब राहत असता, तेव्हा फ्रेशर म्हणून विद्यापीठात प्रथमच पाऊल टाकणे क्वचित कठीण जाऊ शकते. नवीन मित्रपरिवार जोडणे, वेळेचे नियोजन करणे, आपले प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी मेहनत घेणे, कामे हातावेगळी करणे या सगळ्या गोष्टी मोठ्या वाटू शकतात. 

पण, असे वाटणारे तुम्ही एकटे नाही. दरवर्षी, हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी घरापासून लांब नव्या शहरांत, नव्या देशात विद्यापिठातले फ्रेशर्स म्हणून जातात. विद्यापीठातील तुमचे आयुष्य सुकर होण्यासाठी काही अ‍ॅप्स पडताळून पहा.

आपले संवादकौशल्य आणि भाषेवर हातखंडा मिळवा.

विद्यार्थी म्हणून आपल्या करीअरवर पकड मिळवण्याचाच हा काळ असून अधिक उंचीवर पोहोचण्यासाठी संवादकौशल्य ही गुरूकिल्ली असते. या कौशल्याचा केवळ व्यावसायिक कामांतच तुम्हाला उपयोग होतो असे नव्हे, तर वेगवेगळ्या लोकांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी नाते जोडण्यासाठीही याचा तुम्हाला उपयोग होतो. एन्गुरू हे असेच एक अ‍ॅप आहे. केवळ 40 ते 50 तासांत युजर्सच्या गरजांनुसार प्रशिक्षणाधारित कौशल्य सेवा देऊन आपल्या संवादकौशल्यात या अ‍ॅपमुळे आपण प्राविण्य मिळवू शकतो.

करीयर घडवणारी अ‍ॅप्सआपल्या कामांचे नियोजन व यादी करा

फ्रेशर म्हणून तुमच्या असाईन्मेण्ट्सबद्दल तुमचा गोंधळ उडू शकतो. सगळ्या असाईन्मेण्ट्स आणि प्रकल्प हाताळणे तुम्हाला कठीण जाऊ शकते. आपल्या कामांबद्दल आणि असाईन्मेण्ट्सबद्दल अपडेट राहिल्याने हा ताण हलका होऊ शकतो. ट्रेल्लो या अ‍ॅपच्या मदतीने आपल्या असाईन्मेण्ट्स आणि अन्य कामांचे नियोजन करणे तुम्हाला अधिक सोपे जाऊ शकते.

ऑफर्स आणि सवलतींसह अनेक वस्तू घरच्या घरी ऑर्डर करा

किराणा सामान आणण्यासाठी दुकानात जाण्याची इच्छा नाही? तसेच, खिशावर ताण आणू न देता बरेच सामान खरेदी करायचे आहे का? डुन्झो हे अ‍ॅप एकदा ट्राय करा. तुम्हाला गरजेच्या असलेल्या सगळ्याच्या  सगळ्या वस्तू तुम्हाला खास सवलतीसह या अ‍ॅपवर घरच्या घरी उपलब्ध होतील.

जलद आणि सोपे पदार्थ बनवायला शिका.

नेहमीच्या रेडी-टू-इट मिल पॅक्सचा कंटाळा येऊन तुम्ही लवकर बनवता येणार्‍या एखाद्या टेस्टी पर्यायाच्या शोधात आहात का.. विद्यापिठात राहणे काहीसे ताण देणारे असू शकते आणि त्यासाठीच आपला आहार चांगला असणे महत्वाचे ठरते. रेडी-टू-इट पदार्थ किंवा बाहेर जेवायला जाण्यासाठी विद्यार्थी प्रसिद्ध असतात. सोपे आणि घरगुती पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करायचा असल्यास, ऑल रेसिपीज हे अ‍ॅप तुमच्यासाठी उत्तम आहे. तुमच्या निवडीसाठी या अ‍ॅपमध्ये शेकडो रेसिपीज आहेत. तुमचा मूड असेल आणि वेळही असेल, तेव्हा यातली एखादी रेसिपी करून पहायला हरकत नाही.

करीयर घडवणारी अ‍ॅप्स करीयर घडवणारी अ‍ॅप्स Reviewed by News1 Marathi on June 27, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads