Header AD

तर घर - पाणीपट्टी माफ करा - संदिप शिंदे

 न्यूज१ मराठी । नेटवर्क 

पावसाळ्यात घरात पाणी शिरले तर घरपट्टी व पाणी माफ करा असे आवाहन ठाणे शहर ब्लॉक क्रमांक 8 काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना केले आहे.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सर्वत्र नागरिकांच्या घरात पाणी शिरलेले आहे. ठाणे महापालिका नागरिकांकडून घरपट्टी व पाणीपट्टी वेळेत घेते. कर वेळेत न भरल्यास व्याज लावते किंवा नोटीस लावून मालमत्ता जप्ती करते. 

त्याचप्रमाणे ज्या नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरून नुकसान होईल त्यांना घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी आणि संबंधित अधिकारी व ठेकेदारांकडून त्याची वसूली करावी याबाबत सर्क्युलर काढून जनतेला न्याय द्यावा असे आवाहन ठाणे शहर ब्लॉक क्रमांक 8 काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना केले आहे.
तर घर - पाणीपट्टी माफ करा - संदिप शिंदे तर घर - पाणीपट्टी माफ करा - संदिप शिंदे Reviewed by News1 Marathi on June 29, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

एम,एस,एम,ईंच्या डिजिटल परिवर्तना साठी ट्रेड इंडियाचा पुढाकार

■हरियाणा सरकारसोबत केला करार ~ मुंबई, २ मार्च २०२१ :   ट्रेडइंडिया हा देशातील सर्वात प्रमुख बीटूबी आणि ऑनलाइन मार्केट प्लॅटफॉर्म असून या प्ल...

Post AD

home ads