Header AD

स्पेलिंग चुकले म्हणून शिक्षकाकडून लहानग्याला मारहाण न्यूज१ मराठी । नेटवर्क 

स्पेलिंग चुकले म्हणून एका 5 वर्षांच्या मुलाला शिकवणीच्या शिक्षकाने स्टीलच्या पट्टीने बेदम मारहाण केली. या संतापजनक प्रकारानंतर अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे. दरम्यान, लहानग्याच्या शरीरावरच नव्हे, तर मनावरही आघात झाल्याचे सांगण्यात आले आहेत. हा मुलगा प्रचंड दडपणाखाली आहे.  अंबरनाथ पूर्वेच्या राहुल इस्टेट परिसरात असलेल्या युरेकीड्स क्लासेसमध्ये हा प्रकार घडला. या क्लासमध्ये ग्रीनसिटी भागात राहणारा 5 वर्षीय मुलगा ट्युशनसाठी जात होता. 

स्पेलिंग चुकले म्हणून  शिक्षकाकडून लहानग्याला मारहाण

मंगळवारी त्याला क्लासचा शिक्षक नितेश प्रधान याने स्पेलिंग येत नसल्याच्या कारणावरून स्टीलच्या पट्टीने बेदम मारहाण केली.बुधवारी या मुलाला अंघोळ घालत असताना त्याच्या आईला त्याच्या अंगावर हिरवे निळे झालेले वळ दिसले. याबाबत विचारणा केली असता मुलाने नितेश प्रधान याचे नाव सांगितले. यानंतर मुलाच्या आईने थेट पोलिसात धाव घेत प्रधान याच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रधान याच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्पेलिंग चुकले म्हणून शिक्षकाकडून लहानग्याला मारहाण स्पेलिंग चुकले म्हणून  शिक्षकाकडून लहानग्याला मारहाण Reviewed by News1 Marathi on June 29, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

शिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्या नंतर डॉक्टरांचे उपोषण मागे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याणमध्ये एका खाजगी रुग्णालयात शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि डॉक्टर अश्विन कक्कर यांच्यात झालेल्या वादानं...

Post AD

home ads