योगाचा इतिहास
न्यूज१ मराठी । नेटवर्क
योग दहा हजारपेक्षा जास्त वर्षांपासून प्रचलित आहे. या परंपरेचा उल्लेख नारदीय सुक्त आणि सर्वात प्राचीन अशा ऋग्वेदामध्ये आढळतो. हा आपणास पुन्हा सिंधू-सरस्वती सभ्यतेचे दर्शन घडवतो. या सभ्यतेमधील पशुपतीनाथांच्या एका नाण्यावर योगमुद्रा विराजमान आहे जी त्या काळातील योगाच्या व्यापकतेचे द्योतक आहे. अतिप्राचीन उपनिषद बृहद अरण्यक मध्ये योगामधील काही शारीरिक आसनांचा उल्लेख आढळतो. छान्दोग्य उपनिषदामध्ये प्रत्याहार चा तर बृहद अरण्यक मधील एका स्तवनामध्ये प्राणायाम चा सविस्तर उल्लेख आहे. प्रचलित योगाच्या स्वरूपाचा प्रथम उल्लेख कठोपनिषदमध्ये आहे जी आयुर्वेदाच्या कथा शाखांमधील अंतिम आठ वर्गांमध्ये पहिल्यांदा येते जे मुख्य आणि अत्यंत महत्वाचे उपनिषद आहे. येथे योगाला अंतर्मनाच्या यात्रेसाठी तसेच चेतनेच्या विकासासाठी गरजेच्या प्रक्रियेच्या रुपात जाणले जाते.
प्रसिद्ध संवाद योग याज्ञवाल्क्य, जो बाबा याज्ञवल्क्य आणि शिष्या गार्गी यांच्यामधील संवाद आहे, ज्याचे वर्णन बृहद अरण्यक उपनिषदमध्ये आहे, यामध्ये श्वास घेण्याचे कित्येक व्यायाम प्रकार, शारीरिक शुध्दतेसाठी गरजेची आसने आणि ध्यानाचा उल्लेख आहे. गार्गी लिखित छांदोग्य उपनिषद मध्ये देखील योगासनांचा उल्लेख आहे.
अथर्ववेदमध्ये संन्याशांच्या एका समुहामधील चर्चेनुसार शारीरिक आसने ही योगासने म्हणून विकसित होऊ शकतात यावर भर दिला आहे. विविध संहितांमध्ये असा उल्लेख आढळतो कि प्राचीन काळी मुनी, महात्मा आणि विविध संतांद्वारे कठोर शारीरिक आचरण, ध्यान आणि तप केले जात असे.
काळानुसार योग एक आचरणाच्या रुपात प्रसिद्ध होत गेला आहे. भगवत गीतेसह महाभारतातील शांतिपर्वामध्ये योगाचा खुलासेवार उल्लेख आढळतो.
महाभारत आणि भगवत गीतेच्या फार पूर्वी वीसपेक्षा ज्यादा उपनिषदामध्ये सर्वोच्च चेतनेसोबत मनाचे मिलन होणे म्हणजे ‘योग’ असे सांगितले गेले आहे. हिंदू दर्शनातील प्राचीन मुलभूत सूत्रांच्या रुपामध्ये योगाची चर्चा आहे, ज्यांचा अलंकृत उल्लेख पतंजली योग सूत्रमध्ये आहे. महर्षी पतंजली आपल्या दुसर्याच योग सूत्र मध्ये योगाची व्याख्या अशी करतात. पतंजलींचे लेखन देखील अष्टांग योग साठी आधार बनले आहेत. जैन धर्मातील पांच प्रतिज्ञा आणि बौध्द धर्मातील योगाचाराची बीजे पतंजली योग सूत्रामध्ये आहेत. मध्य कालीन युगात हठ योगाचा विकास झाला.

Reviewed by News1 Marathi
on
June 28, 2019
Rating:

Post a Comment