मासुंदामधील पावसाळ्यातील बोटिंग जीवाशी खेळ
न्यूज१ मराठी । नेटवर्क
तलावमध्ये पावसाळ्यात बोटिंगसाठी बंदी असताना देखील भर पावसात ठाण्यातील तलावामध्ये बोटिंग सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाळ्यात होणार्या या बोटिंगमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात असून प्रशासन किंवा ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
ठाण्यातील बहुतेक तलावामध्ये अनेक वर्षांपासून बोटिंग चा आनंद घेण्यासाठी ठाणेकर येत असतात, दरम्यान पावसाळी हंगामात ही बोटिंग सेवा बंद करण्यात येते मात्र भर पावसात बोटिंग सुरू असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मासुंदा तलावात देखील गुरुवारच्या दिवशी पावसात बोटिंग सुरू आहे, ठेकेदाराने आपल्या आर्थिक फायद्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळले जात असल्याचा आरोप दक्ष नागरिकांनी केला आहे. दरम्यान जो पर्यंत पाऊस सुरू आहे तो पर्यंत ठाण्यातील सर्वच तलावमधील बोटिंग बंद करण्यात यावी. ठाण्यातील अनेक तलावामध्ये बोटिंगसाठी ठेकेदारांना ठेका चालवण्यासाठी दिला आहे. पावसाचे दिवस सुरू झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळ्यात बोटिंग बंद करण्यात येते, मात्र सर्रासपणे बोटिंग सुरू असल्याने याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नागरिकांनी देखील भावनेच्या भरात न जाता कृपया पावसाळ्यात बोटिंग करण्यात जाऊ नये.

Reviewed by News1 Marathi
on
June 28, 2019
Rating:
Post a Comment