आता प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी कक्ष - डॉ. रणजित पाटील
न्यूज१ मराठी । नेटवर्क
डॉ.पाटील म्हणाले, मुंबईच्या धर्तीवर राज्यात ठाणे, पुणे व नागपूर या आयुक्तालयाच्या ठिकाणी व औरंगाबाद, नाशिक शहर, रायगड या जिल्ह्याकरीता स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन केले आहेत. यासंदर्भातील गुन्ह्याचे प्रकरण दिवाणी न्यायालयाऐवजी सत्र न्यायालयात चालवणे, दोन वर्षाची शिक्षा 10 वर्षे तर 10 वर्षाची शिक्षा 20 वर्षे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाने केलेल्या कारवाईअंतर्गत एक हजार 21 कोटी 73 लाख 21 हजार 853 रूपयांचे फेंटनेल ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. मुंबई शहरात अंमली पदार्थ विरोधी कक्षामार्फत आझाद मैदान, वरळी, बांद्रा, घाटकोपर व कांदिवली हे पाच युनिट कार्यरत असून, यांच्यात वाढ करण्यात येईल. तसेच विशेष पथकासाठी मनुष्यबळ वाढविण्यात येईल. कोणताही निधी कमी पडू देणार नसल्याची माहिती डॉ.पाटील यांनी यावेळी दिली. मंगळवेढ्यात इतर राज्यातून येणार्या अंमली पदार्थासंदर्भात चेक नाक्यावरील सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात येईल आणि जे पोलीस अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मुंबईतील मानखुर्द व शिवाजीनगर येथील अल्पवयीन बालकांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात येईल, अशी माहितीही डॉ.पाटील यांनी यावेळी दिली.
आता प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी कक्ष - डॉ. रणजित पाटील
Reviewed by News1 Marathi
on
June 29, 2019
Rating:

Post a Comment