Header AD

मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल न्यूज१ मराठी । नेटवर्क 

राज्य सरकारने शैक्षणिक क्षेत्रातील आणि नोकरीतील मराठा आरक्षण वैध असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. दरम्यान याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराज आरक्षणाला विरोध असणारे याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलं आहे. याचिकाकर्त्यांची पूर्ण बाजू ऐकल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाऊ नये यासाठी आतापासूनच हालचाल सुरु झाली आहे. दरम्यान राज्य सरकारही याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करणार असल्याची माहिती आहे. मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असून राज्य सरकारला आरक्षण जाहीर करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे. मात्र 16 टक्के आरक्षण देता येणार नाही, नोकरी आणि शिक्षण यामध्ये 12 ते 13 टक्के मर्यादा आणली पाहिजे असं न्यायालयाने म्हटलं आहे. 

मराठा आरक्षण प्रकरणी  सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

एखाद्या समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागास ठरवून त्यासाठी स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय गुरुवारी वैध ठरवला. मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार की नाही, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. राज्य मागासवर्ग आयोगाने ज्या माहितीच्या आधारे मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागास ठरवत आरक्षण देण्याची शिफारस केली, तो अहवाल न्यायालयाने योग्य ठरवला. त्याच्याच आधारे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. पुरेशा माहितीच्या आधारे राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागास ठरवले, असा निर्वाळा न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने दिला.

मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल मराठा आरक्षण प्रकरणी  सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल Reviewed by News1 Marathi on June 29, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

Ganesh Deshmukh Saheb Happy Birthday

 

Post AD

home ads