Header AD

भिवंडीत स्लॅब कोसळून मुलीचा मृत्यू

 न्यूज१ मराठी । नेटवर्क 

भिवंडी शहरातील गंगाजमुना या दुमजली इमारतीतील पहिल्या मजल्यावरील घराचे स्लॅब कोसळून एका 11 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात मुलीची आई आणि बहीणही जखमी झाले आहेत. भिंवडीतील पद्मानगरात मार्कंडेय भागात काल रात्री उशिरा ही घटना घडली. 

 भिवंडीत स्लॅब कोसळून मुलीचा मृत्यू

मार्कंडेय भागात असलेली गंगाजमुना ही दुमजली इमारत 30 वर्षे जुनी आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीत एनगुंदला कुटुंब राहते. खोलीचे मालक उमेश एनगुंदला, त्यांची पत्नी स्नेहा आणि दोन मुली दोन वर्षांपासून भाड्याने राहत आहेत. या दुर्घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उमेश एनगुंदला हे मंगळवारी रात्री कामावरून परतल्यानंतर आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्या वेळी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एनगुंदला यांच्या खोलीतील स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. खाली पडलेल्या प्लास्टरचा मोठा भाग एनगुंदला यांची मोठी मुलगी साक्षी हिच्या डोक्यावर आणि छातीवर पडला. 
यानंतर तातडीने साक्षीला स्वर्गीय इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. साक्षीचा दुर्दैवी अंत झाला. तर, या दुर्घटनेत साक्षीची आई स्नेहा आणि बहीण प्रगती जखमी झाल्या. 
भिवंडीत स्लॅब कोसळून मुलीचा मृत्यू  भिवंडीत स्लॅब कोसळून मुलीचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on June 27, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads