पाठ फिरवलेल्या पावसाचे जोरदार आगमन
न्यूज१ मराठी । नेटवर्क
ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेले पाहायला मिळाले, यामध्ये मखमली तलाव, उथळसर, सरस्वती इंग्लिश स्कूल, कामगार हॉस्पिटल, बी केबिन, साकेत रस्ता, माजीवाडा नाका अशा विविध ठिकाणी पाणी साचलं होतं. रेल्वेस्थानक परिसरातही पाणी साचल्यामुळे फलाटांना धबधब्याचे स्वरूप मिळालं होतं. रेल्वे मार्गावर पाणी आल्यामुळे उपनगरीय सेवा धीम्या गतीने धावत होती, इतक्या दिवस पाऊस नसल्यामुळे सर्वजन चिंतीत होते मात्र या पहिल्याच पावसाने सर्वाना गारेगार करुन टाकले आहे, ठाणे स्थानकात पाणी भरले.सततच्या पडणार्या पावसाने ठाणे स्थानकात पूर्ण पाणी भरले होते. सिएसएमटीकडे जाणार्या धीम्या मार्गावर ट्रॅकच्या वर पाणी भरले होते. पावसामुळे लोकल गाड्यांची वाहतूक अतिशय सावधगिरने सुरू होती. संध्याकाळी कल्याण कडून येणार्या गाड्या खोळंबल्या होत्या त्यामुळे गाड्या अर्धा तास उशिराने धावत होत्या.
पाठ फिरवलेल्या पावसाचे जोरदार आगमन
Reviewed by News1 Marathi
on
June 29, 2019
Rating:

Post a Comment