Header AD

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या बोधचिन्हाचे थाटामाटात अनावरण

 न्यूज१ मराठी । नेटवर्क 

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या नव्या बोधचिन्हचे अनावरण शुक्रवारी महापौर मिनाक्षी शिंदे यांच्याहस्ते  करण्यात आले.  ख्यातनाम चित्रकार सतीश खोत यांच्या संकल्पनेतून हे नवीन बोधचिन्ह बनवण्यात आले आहे. यावेळी जेष्ठ पत्रकार आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातील  दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या सदस्यांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला.

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारी संघातील सदस्यांच्या दहावी आणि बारवी इयत्तेत उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाण्याच्या प्रथम नागरिक महापौर मिनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, ठामपा उपायुक्त संदीप माळवी, शिक्षण सभापती विकास रेपाळे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश मोरे यांच्यासह गुणवंत विध्यार्थी आणि पत्रकार उपस्थित होते.

 दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार सदस्यांच्या पाल्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. भविष्यात विद्यार्थीना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या बोधचिन्हाचे थाटामाटात अनावरण  ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या बोधचिन्हाचे थाटामाटात अनावरण Reviewed by News1 Marathi on June 29, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

आर. सी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

ठाणे (प्रतिनिधी)  :-   ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील ज्येष्ठ नेते तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आर. सी. पाटील आणि त्यांचे पुत्र भाजपचे ठाणे ज...

Post AD

home ads