Header AD

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमास सक्तमजुरी

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

घरात कोणी नसल्याचा फायदा घेत शेजार्‍याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. यामुळे हादरलेल्या पीडितेने ही बाब आपल्या आईला सांगितली. मात्र तो चांगला मुलगा असून तू त्याच्यावर आरोप करत असल्याचे आईने पीडितेला ठणकावले. त्यामुळे पोलिसांनी पुढे होत याबाबत तक्रार दाखल केल्याने त्या नराधमाचे पाप उघड झाले. आता ‘त्या’ नराधमास अलिबाग सत्र न्यायालयाने दहा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. अवधूत भागणा असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना एप्रिल आणि मे 2014 मध्ये मुरुड तालुक्यातील गावात घडली होती.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमास सक्तमजुरी

पीडित मुलगी तिच्या मामाच्या घरात आईसोबत राहत होती. तर आरोपी हा त्यांच्या घरामागे राहत होता. पीडित मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आरोपी अवधूतने जवळीक साधण्यास सुरुवात केली होती. अशातच 2014 मध्ये एप्रिल आणि मे महिन्यात पीडित मुलीच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत तो तिच्या घरात शिरला. तिला घराच्या माळ्यावर नेऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून आरोपी अवधूत विरोधात भादंवी कलम 376 आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
केला.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमास सक्तमजुरी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमास सक्तमजुरी Reviewed by News1 Marathi on June 27, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

मुंब्रा बायपास रस्त्याला शिक्षण महर्षी कालसेकर यांचे नाव द्या शमीम खान

ठाणे (प्रतिनिधी)   मुंब्रा शहरातून बायपासच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याला ए. आर. कालसेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री ...

Post AD

home ads