Header AD

स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला ‘मोगरा फुलला’

 न्यूज१ मराठी । नेटवर्क 

श्राबणी देवधर दिग्दर्शित आणि अर्जुन सिंग बरन व कार्तिक निशाणदार ‘जीसिम्स’ निर्मित ‘मोगरा फुलला’ 14 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात झाला प्रदर्शित

आई-मुलाचे, प्रियकर-प्रेयसीचे प्रेम अधोरेखित करणारा, एक कौटुंबिक संदेश देणारा आणि स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला श्राबणी देवधर दिग्दर्शित ममोगरा फुललाफ हा चित्रपट 14 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आणि हा सिनेमा थोड्या दिवसातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने एकुण 1 कोटी 45 लाखांचा गल्ला जमवला होता. चित्रपटाने दुसर्‍या आठवडयातदेखील आपली घौडदौड कायम ठेवत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 17 जून ते 23 जून या दुसर्‍या आठवड्यात एकूण 2 कोटी 72 लाख इतकी कमाई केली आहे. ‘मोगरा फुलला’ सिनेमाला एकूण मिळणारा प्रतिसाद बघता सिटी प्राईड चेन, ठाणे आणि मुंबई येथील थियटरमधील चित्रपटाच्या शोची संख्या वाढविण्यात आली आहे. आणि यामुळेच सिनेमालादेखील प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून ‘मोगरा फुलला’ या सिनेमाची दोन आठवड्यांची एकूण कमाई 4 करोड 17 लाख इतकी झाली आहे.

स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला ‘मोगरा फुलला’

‘नाजूक नात्यांचा गुंफलेला गजरा’ या टॅगलाईनसह प्रदर्शित झालेला ‘मोगरा फुलला’ चित्रपटात स्वप्नील जोशी, सई देवधर, नीना कुळकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, आनंद इंगळे, संदीप पाठक आदींच्या दमदार अभिनयाने नटला आहे. नीना कुळकर्णी यांच्या रूपाने बर्‍याच काळाने पडद्यावर एक हृदयाला भिडणारी आई रसिकांना पाहायला मिळते, तर दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रकांत कुलकर्णी स्वप्नीलच्या काकाच्या भूमिकेत वेगळी छाप पाडून जातात. अशा अनेक हळुवार नात्यांची पैशांनी श्रीमंत होणं सोप्पं, नात्यांनी समृद्ध होणं कठीण या टॅगलाइनमधील गुंफण प्रत्यक्ष पडद्यावर अनुभवता येते.

चित्रपटातील गाणी अभिषेक कणखर यांनी लिहिली असून रोहित राऊतने संगीत दिले आहे. शंकर महादेवन, बेला शेंडे, जसराज जोशी यांच्या आवाजातील गाणी उत्तम जुळून आली आहेत. उत्तम कथा, कलाकारांचा दमदार अभिनय, चांगली संकल्पना आणि सुमधुर संगीत यांच्यामुळे ‘मोगरा फुलला’ हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील यात काही शंका नाही.
स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला ‘मोगरा फुलला’ स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला ‘मोगरा फुलला’ Reviewed by News1 Marathi on June 29, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत ओळ्ख पत्रावर चुकीच्या परीक्षा केंद्राचा उल्लेख केल्याने शेकडो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित..

भिवंडी : दि.२८ ( प्रतिनिधी )   राज्य शासनाने शिक्षणासंदर्भात कोणतेही धोरण निश्चित न केल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्ग हैराण झाला असतानाच  अन...

Post AD

home ads