Header AD

जल्लोषपूर्ण वातावरणात डिजी ठाणेची ‘डिजीहॉबीज’ स्पर्धा संपन्न

 न्यूज१ मराठी । नेटवर्क 

पायाभूत सुविधांबरोबर आनंददायी जीवनाकरिता युवकांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी ठाणे महानगरपालिका व स्मार्ट सिटी कंपनी सदैव प्रयत्नशील असून डिजिटल माध्यमातून युवकांना नवे व्यासपीठ निर्माण करणार असे प्रतिपादन ठाणे स्मार्टसिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त(2) समीर उन्हाळे यांनी आज केले. डीजीठाणेच्यावतीने शहरातील युवा वर्गासाठी आयोजित करण्यात आलेल्या ’डिजीहॉबीस’ अंतर्गत गायन, नृत्य, फोटोग्राफी व रॅप  गायन स्पर्धेतील विजेत्यांच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.  यावेळी डीजी ठाणेचे अंकित भार्गव, स्पर्धेचे परीक्षक संजय मुरकुरकर,भाविन  जोशी,एमसी मारटी,अभय धुमाळ  आदी उपस्थित होते.

 ठाणे स्मार्ट सिटी आणि डीजी ठाणे या डिजीटल प्रणालीच्या माध्यमातून ठाणे शहरातील विद्यार्थी, ज्येष्ट नागरिक, युवावर्ग यांच्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. यावेळी शहरातील युवकांसाठी  ‘डिजीहॉबीज’ अंतर्गत गायन, नृत्य, फोटोग्राफी व रॅप  गायन या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेतील प्राथमिक फेरीतील विजेत्यांची अंतिम फेरी आज महापालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडली.या स्पर्धेला युवकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे गायन स्पर्धेत 20 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक  समृद्धी जाधव, 20 वर्षावरील गटात प्रथम स्नेहल मयेकर, क्लीक ठाणे फोटोग्राफी स्पर्धेत प्रथम विपीन पांचाळ, नृत्य स्पर्धेत 20 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक लालची वेलवंशी, 20  वर्षावरील गटात प्रथम मधूली मंडल, तर  रॅप गायन स्पर्धेत प्रथम सागर चंदनशिवे, द्वितीय क्रमांक सोहंम सुर्वे, तर तृतीय क्रमांक प्रिया कारंडे यांनी पटकावला. डीजी ठाणेच्या सोशल माध्यमातून मतदान प्रक्रियेद्वारे झालेल्या स्पर्धेत गायन स्पर्धेत 20 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक समृद्धी जाधव, 20 वर्षावरील गटात प्रथम गौरी पाटील,  क्लीक ठाणे फोटोग्राफी स्पर्धेत प्रथम आकाश सिंग, नृत्य स्पर्धेत 20 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक अनेश जोशी, 20 वर्षावरील गटात प्रथम गुरुशिष मल्होत्रा, आणि रॅप गायन स्पर्धेत प्रथम तुषार लियाबोई, दरम्यान स्पॉट लाईक वोटिंगच्या माध्यमातून गायन स्पर्धेत 20 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक गोसावी, 20 वर्षावरील गटात प्रथम श्रीकांत उनकुल, नृत्य स्पर्धेत सचिन कांबळे, तर रॅप गायन स्पर्धेत प्रतिक शिर्के यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या सर्व विजेत्यांना पारितोषिक देवून गौरवण्यात आले.  तसेच स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना देखील  प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आले.

जल्लोषपूर्ण वातावरणात डिजी ठाणेची ‘डिजीहॉबीज’ स्पर्धा संपन्न जल्लोषपूर्ण वातावरणात डिजी ठाणेची ‘डिजीहॉबीज’ स्पर्धा संपन्न Reviewed by News1 Marathi on June 29, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads