Header AD

कंत्राटी सफाई कामगारांची उपासमार

 न्यूज१ मराठी । नेटवर्क 

ठाणे महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना दोन महिने पगार नसल्याने त्यांची उपासमार होत असल्याचा मुद्दा आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत बोलताना मांडला. यामुळे खळबळ  उडाली.  ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागात काम करणार्‍या कंत्राटी सफाई कामगारांना दोन महिने पगार मिळाला नसल्यामुळे त्यांची व कुटुंबांची उपासमार होत असून तातडीने वेतन देणे बाबत शासनाने निर्देश द्यावेत अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी विधानसभा अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे केली. 

कंत्राटी सफाई कामगारांची उपासमार
सफाई कामगारांमुळे शहर स्वच्छ रहाते. कामगारांच्या मुलांच्या आता शाळा सुरू झाल्या असून शाळापयोगी साहित्य घेण्यासाठीही त्यांच्या हातात पैसे नसल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कामगारांना श्रमाचे वेळेवर दाम हा हक्क आहे त्यामुळे कोणीही मनमानी करू नये असे आवाहनही आ. केळकर यांनी केले आहे.
कंत्राटी सफाई कामगारांची उपासमार कंत्राटी सफाई कामगारांची उपासमार Reviewed by News1 Marathi on June 28, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

वी फाउंडर सर्कलची काऊच फॅशन मध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

  मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ :  वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्...

Post AD

home ads