Header AD

शूटिंग टीमला ठाणे पोलिसांचे कव्हर

 न्यूज१ मराठी । नेटवर्क 

ठाण्यात सुरु असलेल्या सिरीयल किव्हा फिल्मच्या शूटिंग टीमला आता ठाणे पोलिसांची मिळणार सुरक्षा ,यासाठी ठाणे भागात एक नोडल अधिकारी तर ग्रामीण भागात एक नोडल अधिकारी नेमण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली. त्यामुळे ठाणे पोलिसांचा महत्वाचा निर्णय असल्याचे सिने कलाकारांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी ठाण्यातील कासारवडवली भागात एका वेब सिरीज च्या शूटिंग दरम्यान शूटिंग टीमला काही अज्ञान लोकांकडून मारहाण झाल्याच्या प्रकार घडला होता. शूटिंग लोकेशनच्या वादावरून ही मारहाण झाली होती या घटनेनंतर फिल्म शुटिंग टीमच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्याचाच विचार करून ठाणे पोलीस आयुक्तांनी फिल्म शूटिंग कमिटी ,स्टुडियो मालक व पोलीसानची संयुक्त बैठक बोलावली होती. यामध्ये सिने कलाकार ही सामील झाले होते. यामध्ये पोलिसांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले असून शहरी भागासाठी पोलिसांकडून एक नोडल अधिकारी व ग्रामीण भागासाठी एक नोडल अधिकारी ठाणे आयुक्तांनी नेमला आहे. या बैठकीत इंडियन फिल्म टेलिव्हिजन डायरेक्टर असोसिएशन अशोक पंडित आणि सिने कलाकार माही गिल उपस्थित होते.
शूटिंग टीमला ठाणे पोलिसांचे कव्हर

ठाण्यात सुरु असलेल्या सिरीयल किव्हा फिल्मच्या शूटिंग टीमला आता ठाणे पोलिसांची सुरक्षा मिळणार आहे. ठाणे पोलिसांनी असा महत्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील हे ठाणे ग्रामीण भागाचे नोडल अधिकारी तर ठाणे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांना शहरी भागाचे नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहेत.

तर फिल्मी जगतच्या टीमने ही ठाणे पोलिसांचे आभार मानले कारण अश्या प्रकारे बैठक घेऊन आम्हाला त्यांनी सुरक्षित केले असल्याचे यावेळी कलाकारांनी सांगितले. आतापर्यंत पोलीस आणि शुटिंग टीमच्या मध्ये कधीच ताळमेळ नव्हता,परंतु आता आम्हाला पोलिसांचे छत्र छाया मिळालं आहे, आम्ही ठाणे पोलिसांचे आभार मानतो असे सिने कलाकार माही गिल यांनी यावेळी आवर्जून सांगितले आहे. 
शूटिंग टीमला ठाणे पोलिसांचे कव्हर शूटिंग टीमला ठाणे पोलिसांचे कव्हर Reviewed by News1 Marathi on June 28, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

कोनगांव ग्राम पंचायतीने जन आंदोलनाचा ईशारा देताच एम,आय,डीसी विभागा कडून पाणी पुरवठा सुरळीत

भिवंडी दि.६ (प्रतिनिधी  ) गेल्या वर्षभरापासून कोनगावला एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाकडून अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.त्यातच कोवि...

Post AD

home ads