Header AD

लवकरच येणार ‘एक देश-एक रेशनकार्ड’ योजना


 न्यूज१ मराठी । नेटवर्क 

केंद्रातील मोदी सरकार ‘एक देश- एक रेशनकार्ड’ या घोषणेसह महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. नव्या योजनेमुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार असून रोजगारानिमित्त स्थलांतर करणार्‍या गरिब कामगारांना आपल्या रेशन कार्डावर कोणत्याही राज्यात, कोणत्याही ठिकाणी धान्य घेणे शक्य होणार आहे. या बदलामुळे अधिक कार्ड जवळ बाळगण्याच्या प्रकारालाही आळा बसणार आहे.

लवकरच येणार ‘एक देश-एक रेशनकार्ड’ योजना

 केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान यांच्या नेतृत्वात अन्न सचिवांच्या बैठकीत या निर्णयाची जलदगतीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सतत स्थलांतर करणार्‍या कामगारांना या योजनेचा मोठा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे स्थलांतर करणार्‍या कामगारांना पूर्ण अन्न सुरक्षा मिळणार आहे. या निर्णयामुळे लाभार्थी कोणत्याही एका शिधावाटप दुकानाशी बांधलेले राहणार नसल्याने त्यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळणार आहे, असे रामविलास पासवान यांनी सांगितले. या निर्णयामुळे भ्रष्टाचारालाही आळा बसणार असल्याचे पासवान म्हणाले.  
लवकरच येणार ‘एक देश-एक रेशनकार्ड’ योजना लवकरच येणार ‘एक देश-एक रेशनकार्ड’ योजना Reviewed by News1 Marathi on June 29, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

सापर्डे येथील महिलेच्या हत्येसाठी मुख्य आरोपीला अग्निशस्त्र पुरविणारे दोन आरोपी गजाआड

कल्याण  , कुणाल  म्हात्रे  :    खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सापर्डे गावात २२ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास झालेली हत्या हि अनैतिक...

Post AD

home ads