कल्याण डोंबिवलीत धूम स्टाईल लुटारूंचे थैमान
न्यूज१ मराठी । नेटवर्क
नुकत्याच कल्याण डोंबिवलीत तीन घटना घडल्या असून यामध्ये एक महिलेला दुखापत झाली आहे कल्याण पश्चिम ब्रिंदावन अपार्टमेंट मध्ये राहणारे यशवंत रावराणे हे काल सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वेगाज रेसिडन्सी समोरील रस्त्यावर मोर्निग वॉक करत असताना त्यांना फोन आल्याने ते मोबाईल वर बोलत होत.रावराणे बोलण्यात व्यस्त असल्याचे संधी साधत एका दुचाकीस्वराने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून क्षणार्धात धुम ठोकली. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात दाखल तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला आहे.
कल्याण पश्चिम इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्स मध्ये रहाणार्या रोहिणी देवडीकर या ट्युशन टीचर काल सकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास कासारहाट येथे जाण्यासाठी टिळक चौक येथून पायी जात होत्या. यावेळी अचानक पाठीमागून येणार्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील 75 ह्जार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल हिसकावून धूम ठोकली. यावेळी झालेल्या झटापटीत रोहिणी खाली पडल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात दाखल तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. तिसरी घटना कल्याण पूर्व श्रीराम चौकात घडली अंबरनाथ येथे राहणारे शत्रुघ्न उरमुडे काल सायंकाळच्या सुमारास पुना लिंक रोड श्रीराम चौक येथून जात असताना पाठीमागुण आलेल्या अनोळखी मोटर सायकल स्वाराने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून क्षणार्धात धूम ठोकली. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. तिसरी घटना कल्याण पश्चिम येथील ठाणगे वाडी चौक परिसरात घडली आहे.कल्याण पश्चिम ठाणगेवाडी सीमा बैभव येथे राहणार्या यशोदा कदम काल सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलाला शाळेत सोडून ठाणगेवाडी शीतला मंदिर परिसरातून घराकडे परतत असताना एक भरधाव वेगाणे दुचाकि आली.
कल्याण डोंबिवलीत धूम स्टाईल लुटारूंचे थैमान
Reviewed by News1 Marathi
on
June 29, 2019
Rating:

Post a Comment