पद्मश्री पंकज उदास यांची गझल मैफिल ‘भिगे लफ्ज़’
न्यूज१ मराठी । नेटवर्क
गझलगायक पद्मश्री पंकज उदास हे त्यांच्या हृदयस्पर्शी, रोमँटिक आणि काळाच्या पुढे असलेल्या अशा गझलांनी रसिकांना मंत्रमुग्ध करण्यास पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. ‘चांदी जैसा रंग है तेरा..,’ ‘चिट्ठी आई है..,’ ‘और आहिस्ता कीजिए बाते..,’ ‘जिये तो जिये कैसे..,’ ‘ना कजरे की धार..,’ ‘चुपके चुपके..,’ ‘आई ये बारिश का मौसम है..’ या आणि अशा कितीतरी गझलांची ही मेजवानी ‘भिगे लफ्ज़’ या संगीत मैफिलीच्या माध्यमातून सादर होणार आहे. शनिवारी 29 जून 2019 रोजी रात्री 7 वाजता नेहरू सेंटर ऑडिटोरियम येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. ‘भिगे लफ्ज़’चे व्यवस्थापन आणि आयोजन द इव्हेंट कंपनी आणि जिंजर पीआर यांनी केले आहे.
पंकज उदास यांच्याकडे गझल लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते. तसेच भारतातील गझलगायन क्षेत्रात पंकज उधास यांना महत्वाचे आधारस्तंभ मानले जाते. त्यांनी या संगीतप्रकाराला एक वेगळी शैली मिळवून दिली. त्यांनी आणि त्यांच्याबरोबरच्या कलाकारांनी भारतात गझलगायनाला एक नवसंजीवनी मिळवून दिली. त्यांनी कित्येक अल्बम आणि गाणी ध्वनिमुद्रित केली आहेत आणि आज त्यांना भारतातील एक आघाडीचा गझलगायक मानले जाते. त्यांच्या याच कामाची पोचपावती म्हणून त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. ‘चिट्ठी आई ह’ या ‘नाम’चित्रपटातील गाण्याने 1986 साली त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. एका रात्रीत त्यांना राष्ट्रीय स्तरावरील लोकप्रियता मिळाली. या हिट गाण्यानंतर त्यांनी बॉलीवूडमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गायली आणि ती अनंत काळापर्यंत रसिकांच्या मनावर गारुड करून राहतील.
पावसाळ्यात संगीत आणि कविता-गीते यांना एक वेगळेच महत्त्व असते. या दोन्ही प्रकारांमध्ये एक आगळा असा बंध आहे. ‘भिगे लफ्ज़’ हा पावसाळ्यात भिजलेल्या अशा गाण्यांची जादू सादर करण्याचा उत्सव आहे. पंकज उदास त्यासाठी सज्ज झाले आहेत. या मैफिलीमध्ये उदास त्यांच्या काही गाजलेल्या गझला, गीते आणि नज्म सादर करणार आहेत. त्यामुळे मी मैफिल यादगार अशीच ठरणार आहे. गझल रसिकांनी येऊन हा आनंद द्विगुणित करावा आणि आगळा असा अनुभव घ्यावा, असे पंकज उदास यांनी म्हटले आहे.
ही संगीत मैफिल म्हणजे संगीतरसिकांसाठी एक पर्वणी असणार आहे. त्यांच्यासाठी आणखी एक आकर्षणाचा विषय म्हणजे रसिकांकडून आलेल्या फर्माईशीनुसार पंकज उधास गझला सादर करणार आहेत. त्याचमुळे हा कार्यक्रम चुकवू नये असाच आहे.
पद्मश्री पंकज उदास यांची गझल मैफिल ‘भिगे लफ्ज़’
Reviewed by News1 Marathi
on
June 29, 2019
Rating:

Post a Comment