ठाण्याच्या अंतर्गत जलवाहतुकीसाठी 645 कोटींची मान्यता
न्यूज१ मराठी । नेटवर्क
महापालिकेमार्फत सादरीकरण केले होते. यानंतर या प्रस्तावाला 24 ऑक्टोबर 2018 रोजी मंजुरी मिळाली होती. याचे नियोजनाचे काम प्रगती पथावर सुरु झालेले आहे. आज पुन्हा खासदार राजन विचारे व श्रीकांत शिंदे यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल व जलवाहतूक केंद्रीय मंत्री मंनसुख मंडाविया यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या विकास प्रकल्प बाबत सादरीकरण करून चर्चा करण्यात आली.
ठाणे महानगरपालिकेने तयार केलेल्या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाच्या ठाणे - वसई -कल्याण डिपीआर ला 645 कोटीची मान्यता मिळाली असून त्याचे नियोजनाचे काम सुरू झालेले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील सुरू झालेल्या वसई ते ठाणे -कल्याण जलमार्ग क्रमांक 53 या 50 किलोमीटरच्या मार्गावर प्रस्थावामध्ये एका ठिकाणी मल्टी मोडल हब व विविध ठिकाणी दहा जेटी असून त्यापैकी 4 जेटीची कामे प्रस्तावित केले असून त्यासाठी जेनपेटी मार्फत कार्यवाही सुरू आहे.
कामांसाठी 85 कोटी एवढ्या रकमेचा अनुदान प्राप्त होण्यासाठी तसेच ठाणे ते मुंबई व नवी मुंबई हा 93 किलोमीटरचा मार्गवरही 18 जेटीची व अनुषंगिक कामे सुरू करायची आहेत. या साठी 717 कोटीची आवश्यकता आहे. मान्यता मिळावी यासाठी खासदार राजन विचारे यांनी आज जल परिवहन केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांची भेट घेऊन त्यांना या कामासाठी लागणारा निधी लवकर वितरित करून द्यावा जेणेकरून कामे लवकर मार्गी लागतील अशी विनंती ती त्यांनी त्यावेळी पत्राद्वारे केली त्यावेळी आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित होते. त्यावर केंद्र सरकार मार्फत या प्रकल्पासाठी 100 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली. तसेच पहिल्या टप्प्यातील कामाची 3 महिन्याच्या आत प्रत्यक्षात सुरुवात करा व दुसर्या टप्प्यातील डीपीआर 3 महिन्यात सादर करा असे आदेश महापालिका प्रशासनाला दिले. त्यावेळी ठाण्याचे खासदार राजन विचारे, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे व ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीवजी जयस्वाल तसेच उपनगर अभियंता पापळकर तसेच या प्रकल्पाचे सल्लागारही उपस्थित होते.

Reviewed by News1 Marathi
on
June 28, 2019
Rating:

Post a Comment