मेट्रोसाठी 20 टक्के अनुदान देण्याची राजन विचारे यांची केंद्राकडे मागणी
न्यूज१ मराठी । नेटवर्क
ठाणे शहरांतर्गत मेट्रो मार्गासाठी 20 टक्के अनुदान देण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे केली आहे. ठाणे शहरांतर्गत मेट्रो सेवा सुरु व्हावी यासाठी शिवसेना सातत्याने प्रयत्न करीत होती.

या 29 किमीच्या अंतर्गत मेट्रो मार्गाला राज्य मंत्रिमंडळाची 9 हजार 674 कोटीची मंजुरी मिळाल्याने ठाणेकरांना प्रवास अधिक सुखकर होणार असून या मार्गाचे काम लवकर मार्गी लागावे यासाठी खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी व या विभागाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांची प्रत्यक्षभेट घेऊन त्यांना ठाणे शहरांतर्गत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी 20टक्के अनुदान केंद्र शासनाचे मिळावेअसा प्रस्ताव बनवून महापालिकेने याचा सविस्तर डीपीआर फेब्रुवारी महिन्यात दिला असून त्याला मान्यता द्यावी अशी मागणी केली आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल, उपनगर अभियंता पापळकर यावेळी उपस्थित होते.
ठाणे शहरांतर्गत मेट्रो रेल्वेची 22 स्थानके
- नवीन ठाणे
- रायला देवी
- वागळे चौक
- लोकमान्यनगर बस डेपो
- शिवाई नगर
- नीलकंठ टर्मिनल
- गांधी नगर
- डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह
- मानपाडा
- डोंगरीपाडा
- विजय नागरी
- वाघबीळ
- वॉटर फ्रंट
- पातली पाडा
- आझादनगर बस स्टॉप
- मनोरमा नगर
- कोलशेत औद्योगिक क्षेत्र
- बाळकुम नाका
- बाळकुम पाडा
- राबोडी
- शिवाजी चौक
- ठाणे जंक्शन
मेट्रोसाठी 20 टक्के अनुदान देण्याची राजन विचारे यांची केंद्राकडे मागणी
Reviewed by News1 Marathi
on
June 29, 2019
Rating:

Post a Comment