‘डिजी ठाणे’ 1.4 लक्ष पार
न्यूज१ मराठी । नेटवर्क
स्मार्ट सिटी संकल्पनेच्या माध्यमातून शाश्वत विकास प्रक्रियेमध्ये नागरिकांच्या सहभागाला प्राधान्य देवून ठाणे स्मार्ट सिटीच्या पुढाकाराने आणि डीजी ठाणे प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये अनेकविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. दरम्यान इस्रायलच्या धर्तीवर राबविण्यात आलेल्या डीजी ठाणे उपक्रमातंर्गत जवळपास 1.4 लक्ष नागरिकांनी नोंदणी केली आहे.
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट सिटीचे अध्यक्ष तथा महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सर्व संचालक मंडळ, लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन स्टेशन, तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्प, पार्किंग व्यवस्थापन, समुह विकास योजना, खाडी किनारा विकास प्रकल्प, एलईडी दिवे प्रकल्प, तलाव सुशोभिकरण व संवर्धन प्रकल्प, मलनि:सारण प्रकल्प, घन कचरा प्रक्रिया केंद्राचे विकेंद्रीकरण, स्मार्ट मीटर, सीसीटीव्ही व वायफाय प्रकल्प असे स्मार्ट सिटी मिशन, राज्य सरकार आणि महापालिका निधीमधून जवळपास 5400 कोटींचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.
या उपक्रमांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते गृहनिर्माण सहकारी सोसायटीपर्यंत समाजैतील सर्व घटकांना शाश्वत विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करून पायाभूत विकासाबरोबरच आनंदी शहराची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी यासाठी ठाणे स्मार्ट सिटीच्यावतीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
या प्रयत्नांचा भाग म्हणून गेल्या वर्षभरामध्ये अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये नवरात्री, गणेशोत्सव, दिवाळी आदी महत्वाच्या उत्सवांमधून नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन, आरोग्य शिबीरे, योगा प्रशिक्षण, पर्यावरण आदी अनेक कार्यक्रमामध्ये स्मार्ट सिटीने आपला सहभाग नागरिकांपर्यंत पोहोचविला आहे. तरूणांचा सहभाग वाढावा यासाठी डीजी ठाणे युथ आयकंन स्पर्धा, व्हॅलेन्टाईन दिनाच्या माध्यमातून सामाजिक आणि नागरी उपक्रम राबवून तरूणांना शाश्वत विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याचे प्रयत्न करण्यात आले. आरोग्याच्या दृष्टीने पल्स पोलिओ, मिसल्स रूबेला लसीकरण आदी उपक्रमामध्ये लक्षणीय कामगिरी बजावली आहे. लहाण मुलांच्या माध्यमातून विकासाची संकल्पना प्रत्येक नाहरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी स्मार्ट किडस् स्पर्धा, महिला दिनाचे कार्यक्रम, स्वच्छता मोहिमेतंर्गत थुंकू नका मोहिम, निवडणूक, मालमत्ता कर मोहिम, रॅप स्पर्धा, नृत्य स्पर्धा असे विविधांगी उपक्रम राबवून सर्व स्तरातील नागरिकांना या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न स्मार्ट सिटीच्या पुढाकाराने डीजी ठाणेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका ओळखून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रसंघाशी सामजंस्य करार करण्यात आला असून ठाणे शहर राहण्यायोग्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

Reviewed by News1 Marathi
on
June 26, 2019
Rating:

Post a Comment