Header AD

12 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची नांदी

 न्यूज१ मराठी । नेटवर्क 

चित्रपट आपल्या आयुष्यातील महत्वाचा भाग मानला जातो. निव्वळ मनोरंजन नव्हे तर समाजप्रबोधनाचे कार्य चित्रपट करतो. त्यामुळे चित्रपट हा समाजाचा आरसा मानला जातो. असेच काही सामाजिक चित्रपट घेऊन ‘फक्त मराठी’ आणि ‘विन्सन वर्ल्ड’ यांच्या संयुक्त विद्यमाने 12 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सव- 2019 चे  आयोजन केले आहे. हा चित्रपट महोत्सव 28, 29, 30 जून 2019 रोजी कला अकादमी, मॅकॅनिझ पॅलेस, आयनॉक्स येथे संपन्न होणार आहे. समाजामध्ये घडणार्‍या वास्तववादी घटना व त्यावर आधारित समांतर चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.   

 12 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची नांदी

या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा 28 जून रोजी कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहात होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रसिद्ध सिने निर्माते, दिग्दर्शक सुभाष घई यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी मानाचा समजला जाणारा ‘कृतज्ञता पुरस्कार’ यावर्षी नितळ, कासव, वास्तुपुरुष, देवराई यांसारखे दर्जेदार वास्तववादी चित्रपट सिनेसृष्टीला देणार्‍या प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना देण्यात येणार आहे. यावेळी मराठी सिनेसृष्टीचे संपूर्ण तारांगणच या महोत्सवामध्ये अवतरून ह्या महोत्सवाचे सौदर्य द्विगुणित करणार आहेत. त्यामध्ये शशिकांत केरकर, संतोष पवार, पंढरीनाथ कांबळे, रमेश वाणी, सुप्रिया पाठारे, कमलाकर सातपुते, मानसी नाईक, पुष्कर जोग, संस्कृती बालगुडे, आशीष पाटील, पूजा सावंत आणि शुभंकर तावडे या कलाकारांचा समावेश आहे.

गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे साक्षीदार होणे ही चित्रपट प्रेमीसाठी एक अनोखी पर्वणी असणार आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा असे महोत्सवाचे संचालक संजय शेट्ये यांनी आवाहन केले आहे. तिकीट नोंदणी बुकमायशो वर करू शकता तसेच अधिक म ाहितीसाठी ुुु.सेरारीरींहळषळश्राषशीींर्ळींरश्र.लेा या वेबसाईटला भेट द्या.
12 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची नांदी  12 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची नांदी Reviewed by News1 Marathi on June 27, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads